घारगाव ते पाडळी रस्त्यावर खड्डेच खड्डे रस्त्याची झाली दुरावस्था
करमाळा प्रतिनिधी
घारगाव ते पाडळी पर्यंत रस्त्यावर खड्डेच खड्डे झालेले आहेत त्या खड्ड्यामध्ये पावसाचे पाणी साचनार असल्यामुळे वाहन चालकांना त्याचा अंदाज येनार नाही त्यामुळे नागरिकांना, शेतकऱ्यांना, दूध उत्पादकांना व शालेय विद्यार्थ्यांना प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागते हा रस्ता घारगाव पासून पाडळी रस्ता तीन किलोमीटर पर्यंत खूप खराब झालेला

आहे. घारगाव पाडळी रस्ता पुढे तरडगाव, जवळा, धोत्री, खरसवाडी, अष्टविनायक गड या ठिकाणी जोडला गेलेला आहे, प्रत्येक चतुर्थीला अष्टविनायक गडावरती भाविक भक्तांची गर्दी असते, या रस्त्यावरून सारखी रहदारी चालू आहे, नाहक सर्वांना याचा त्रास होत आहे, सदर रस्त्यावर जाणाऱ्या वाहनांची बऱ्यापैकी ये जा होत असते तरी प्रशासनाने व

लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करून पावसाळ्या अगोदर खडीकरण करून घ्यावे असे आदेश द्यावेत व खड्डे बुजवावेत अशी मागणी घारगावचे सरपंच लक्ष्मी सरवदे यांनी केली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *