मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड व विविध संघटनेच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी

करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुका मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड व विविध संघटनेच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आर. आर. पाटील, प्रकाशराव लावंड यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती संभाजी ब्रिगेड चे जिल्हा उपाध्यक्ष शंकर पोळ,

बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष प्रा, नागेश माने, बळीराजा शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष शिवाजीराव बनकर, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष अमित घोगरे, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष वैभव माने, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अतुल वारे, तालुका सचिव गणेश डोके, जिल्हा उपाध्यक्ष

संभाजी ब्रिगेड गणेश सव्वाशे, अनिल कणसे, योगेश गुरव, आदित्य जाधव, संजय शिंधी, संतोष कानगुडे, संभाजी ब्रिगेड वाहतूक संघटना, आदि जण पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पोळ म्हणाले की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या धर्मासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली, संभाजी महाराज ग्रंथ पुराण लेखक होते, त्यांनी ग्रंथ निर्माण केले, त्यांना

अनेक भाषा अवगत होत्या, संभाजी महाराज यांनी आदर्श राज्यकारभार केला, त्यांनी लोक भिमुख धर्मनिष्ठ राज्यकारभार केला, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना उपाधी देण्यात आली.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *