प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात डाँक्टर भरती करावे – भाजपा अध्यक्ष चिवटे
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील ग्रामिण भागातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात डाँक्टर भरती करावे याबाबतचे निवेदन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना भाजपा तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांनी दिले आहे. या निवेदनात म्हंटले आहे कि, करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये डॉक्टर नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत, या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात बॉन्डेड झालेले विद्यार्थी नोकरी करण्यास तयार असून देखील जिल्हा प्रशासनाकडून याकडे

दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत व विद्यार्थ्यांनाही न्याय मिळत नाही तरी आपण संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन करमाळा तालुक्यातील ग्रामीण प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात रिक्त पदे भरावे.
यावेळी ज्येष्ठ नेते विठ्ठलराव भणगे, जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, राज्य परिषद सदस्य बाळासाहेब कुंभार, सरचिटणीस काकासाहेब सरडे, तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव, शहर अध्यक्ष जगदीश अग्रवाल,

अमरजित साळुंखे, भाजपचे सरपंच डॉ.अभिजीत मुरुमकर, प्रवीण बिनवडे, उपसरपंच अमोल पवार, मच्छिंद्र हाके, नितीन निकम, बिभीषण गव्हाणे, सोमनाथ घाडगे, किरण शिंदे, मोहन शिंदे, बाळासाहेब होसिंग, नितीन झिंझाडे, संदिपान कानगुडे, महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष राजश्री खाडे, शहर अध्यक्षा संगीता नष्टे, नानासाहेब अनारसे, विनोद महानवर, धर्मराज नाळे, भगवानगिरी गोसावी, बिटरगावचे सरपंच डॉ.अभिजीत मुरुमकर आदिजण उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *