
आज कर्नाटक राज्याचे निकाल जाहीर झाले असुन कर्नाटक राज्यात काँग्रेस या एकट्या पक्षालाच बहुमत प्राप्त झाल्याने अत्यंत आनंद झाला असल्याचे प्रतिपादन प्रतापराव जगताप यांनी केले.
करमाळा प्रतिनिधी
गेल्या दशकापासुन भा.ज.पा.सरकारने देशात वाढवलेली महागाई, बेरोजगारी, महीलावरील होणारे अत्याचार याने जनता त्रस्त झालेली होती. या जनतेला आपला रोष व्यक्त करण्यासाठी एका संधीची गरज होती आणि नेमकी हीच संधी कर्नाटक राज्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने सर्वसामान्य जनतेला मिळाली आणि या संधीचे सोने करण्याचे काम त्या राज्यातील

जनतेने केले. यावेळी काँग्रेस आय पक्षाचे ता.अध्यक्ष प्रतापराव जगताप, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुजय जगताप, काँग्रेस पक्षाचे सरचिटणिस संभाजी शिंदे व इतर कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिशबाजी करत पेढे वाटुन हा आनंद साजरा केला. यापुढील प्रत्येक निवडणुकीत काँग्रेस पक्ष देशाचे नेते राहुलजी गांधी, प्रियंकाजी गांधी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लीकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली अशीच भरारी घेणार असल्याचा ठाम विश्वास शेवटी प्रतापराव जगताप यांनी व्यक्त केला.

