
जातनिहाय जनगणना व्हावी ओबीसी जनमोर्चाच्यावतीने मागासवर्ग आयोगाकडे मागणी
आज राज्य मागासवर्ग आयोगाने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मागासवर्ग आयोगाचे सदस्य माजी न्यायमुर्ती चंद्रलाल मेश्राम आणि अँड. बी. एल. किल्लारीकर यांनी विविध समाज घटकांच्या भेटी घेऊन निवेदन स्वीकारली, निवेदनातून आलेल्या विषयानुसार सविस्तर चर्चा केली. यामध्ये ओबीसी जनम मोर्चा या संघटनेच्या वतीने मागासवर्ग आयोगाला तीन

निवेदने देण्यात आली पहिल्या निवेदनामध्ये जातवार जनगणना करून ओबीसींची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व राजकीय प्रतिनिधित्व जाहीर करण्यासंदर्भातला विषय होता. दुसरे निवेदन मराठा समाजासाठी वेगळा आरक्षणाचा कोटा तयार करून ओबीसी मधील आरक्षणामध्ये त्यांचा सहभाग असू नये आणि तिसरे निवेदन ओबीसी प्रवर्गाच्या सामाजिक, शैक्षणिक,

आर्थिक आणि प्रशासकीय सक्षमीकरणासाठी शासनाने स्थापन केलेल्या महाज्योती संस्थेचे नागपुर येथील मुख्य कार्यालय हे पश्चिम महाराष्ट्र कोकण विभाग या विभागातील लोकांच्यासाठी फारच दूर असल्यामुळे लोकांची अडचण समजून घेऊन

महाज्योतीचे विभागीय कार्यालय कोल्हापूर येथे सुरू करणेसंबधीचे निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी विशाल लोंढे तसेच जातपडताळणी समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

ओबीसी शिष्टमंडळामध्ये ओबीसी जनमोर्चाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस दिगंबर लोहार, राज्य सचिव सयाजी झुंजार, बबनराव रानगे, चंद्रकांत कोवळे साहेब, मोहन हजारे, शिवाजीराव माळकर, बाळासाहेब मोमिन,जहाॅंगीर आत्तार,विजय

मांडरेकर, शितल मंडपे, युवानेता नितिन ब्रम्हपुरे आदींसह प्रतिनिधी उपस्थित होते.