पडसाळी गावात डीपीचे लोकार्पण

जेआरडी माझा

 महाराष्ट्र राज्याचे महसुलमंत्री तथा पालकमंत्री सोलापूर तथा अध्यक्ष जिल्हा नियोजन समितीचे ना राधाकृष्ण विखे पाटील  यांच्या माध्यमातुन खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सहकार्यातुन तसेच आ. रणजितसिंह मोहिते-पाटील व आ सचिनदादा कल्याणशेट्टी यांच्या प्रयत्नाने जिल्हा नियोजन समिती सदस्य  योगेश बाबाराजे बोबडे यांनी पडसाळी गावात

जिल्हा नियोजन समिती (DPDC) मधुन पाटील- साळुंखे वस्ती व माळी- मगर वस्ती येथे ६३ के.व्ही. चे २ ट्रान्सफार्मर(डीपी) मंजुर केले. सदर डीपीचे लोकार्पण ज्येष्ठ नागरीक शंकर मुटकुळे, सुधाकर साळुंखे, विश्वंभर मुटकुळे, महादेव पाटील, विलास पाटील, बिभीषण पाटील यांच्या हस्ते नारळ वाढवुन करण्यात आले. यावेळी माजी सरपंच दत्तानाना फरड, सचिन पाटील

यांनी फीत कापली. यावेळी सरपंच योगेश पाटील, कुर्मदास पाटील, अरूण पाटील, भरत पाटील, महेश पाटील, प्रवीण पाटील, प्रकाश पाटील, अरूण साळुंखे, दत्तात्रय देशमुख, आण्णासाहेब मुटकुळे, किरण पाटील, शशिंगर साळुंखे, हरी पाटील, अनुरथ पाटील, विजय सुर्वे, परमेश्वर फरड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. ह्या डीपीचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी दिपक पाटील यांनी अथक परिश्रम घेतले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *