केम येथे आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नसल्याने मनमानी डॉ चा चाललेल्या कारभाराची चौकशी करावी :-समीर भैय्या तळेकर

केम येथे कुत्रे चावलेल्या व्यक्तीला  आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नसल्याने लस घेण्यासाठी सोलापूर ला जाण्याची वेळ आली  येथील मनमानी डॉ चा चाललेल्या कारभाराची चौकशी करावी समीर भैय्या तळेकर

केम प्रतिनिधी संजय जाधव

करमाळा तालुक्यातील सर्वात मोठया समजल्या जाणाऱ्या केम प्राथमिक आरोग्य केंद्रात ८ मे रोजी एकही डॉ नसल्यानें कुत्रे चावलेल्या नागरिकांला सोलापूर येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये लस घेण्याची वेळ आली येथील बाळासाहेब बब्रुवान तळेकर वय ५६ याना सोमवारी ८ मे रोजी दुपारी कुत्र हाताला चावले त्वरित समीर तळेकर यांनी  कुत्र्याचे इंजेक्शन घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणल पंरूतु  या ठिकाणी एकहि डाॅ ऊपस्थित नव्हते  त्यामुळे त्याना खाजगी गाडी करून सोलापूर ला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जावे लागले या मुळे तळेकर यांना याच्या यातना सोसाव्या लागल्या एवढ्या मोठ्या आरोग्य केंद्रात गेले दोन महिने झाले  डाॅ नाही. त्यामुळे ठाकरे गट शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुख सौ वर्षां ताई चव्हाण

यानी या आरोग्य केंद्रास दहा दिवसांच्या आत   जर डॉ ची नेमणूक न केल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रात टाळे ठोकू असा इशारा दिला होता याची वरिष्ठांशी दखल घेऊन तात्पुरता स्वरुपात  डाॅ ची नेमणूक केली आहे त्यामुळे या डॉ लोकांचा मनमानी कारभार सुरू आहे याला कोणी वाली नाही असी परिस्थिती निर्माण झाली आहे .

 या बाबत जाणता राजा स्फोट क्लबचे अध्यक्ष समीर भैय्या तळेकर यांनी तक्रार दाखल केली आहे. 

 चौकट.   याबाबत करमाळा तालुका आरोग्य अधिकारी बोंडवले  मॅडम यांच्या कडे विचारणा केली असता  केम येथील

प्राथमिक आरोग्य केंद्रात ८ मे रोजी  डॉ उपस्थित नव्हते ही गंभीर परिस्थिती आहे याची माहिती घेऊन कारवाई केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.

करमाळा तालुका आरोग्य अधिकारी

बोंडवले मॅडम

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *