वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गरजूंना मदत :-

वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा शहर व तालुका च्या वतीने करमाळा शहरामध्ये गोरगरीब महिलांना साडी वाटप करून साजरा करण्यात आली.

        वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा शहरातील मौलाली माळ या ठिकाणी गोरगरीब महिलांना साडी वाटप करण्यात आले.

यावेळी वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष राहुल चव्हाण,  करमाळा बिट चे पी.एस. आय  मिठू जगदाळे , साडे व केम बिट चे पी. एस. आय.  प्रवीण साने , ऍड.जुगल खरात यांनी वाढदिवसाचा केक कापला.

यावेळी कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचा सत्कार वंचित बहुजन आघाडी च्या पदाधिकारी यांनी केला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  विलास कांबळे,  देवीदास भोसले,  जालिंदर गायकवाड , तालुका अध्यक्ष नवनाथ साळवे , नंदकुमार कांबळे , शहर अध्यक्ष विशाल लोंढे,  सामाजिक कार्यकर्ते पत्रकार दिपकजी काकडे , गेंदाप्पा कांबळे ,  राजू सय्यद ,

यशवंत कांबळे ,  जितेश रणबागुल ,  लक्ष्मण भालेराव ,   सावताहारी कांबळे , अजय कांबळे , यश कांबळे , आशिष कांबळे ,आदी कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.

मदारी समाजाचा विचार करून समाजामध्ये साडी वाटप केल्याबद्दल मदारी समाजाचे तालुका अध्यक्ष उमर मदारी , आक्रम मदारी , मुन्ना मदारी ,बबलू मदारी यांनी वंचित बहुजन आघाडी करमाळा शहर व तालुका शाखेचे आभार मानले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक नंदू कांबळे यांनी केले तर आभार समाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव काकडे यांनी मानले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *