युवकांनी नोकरीपेक्षा स्वतःचा व्यवसाय निर्माण करून त्यामध्ये सामर्थ्याने टिकून राहून आपलं भवितव्य उज्वल करावे – रश्मी बागल

युवकांनी नोकरीपेक्षा स्वतःचा व्यवसाय निर्माण करून त्यामध्ये स्वाभिमानाने व सामर्थ्याने टिकून राहून आपलं भवितव्य उज्वल करावे. असे आवाहन राज्य सहकारी साखर संघाच्या संचालिका व बागल गटाच्या नेत्या आदरणीय रश्मी दिदी बागल यांनी आज पुणे हडपसर येथे एका कार्यक्रमात व्यक्त केले. आज हडपसर पुणे येथे करमाळा तालुक्यातील मकाई सहकारी

साखर कारखान्याचे संचालक महादेवराव सरडे यांचे सुपुत्र रणजीत सरडे यांच्या शिव कार ॲक्सेसरीज या भव्य शोरूमचे उद्घाटन राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या संचालिका व बागल गटाच्या नेत्या रश्मी दीदी बागल यांच्या यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी अधिक बोलताना रश्मी दिदी बागल म्हणाल्या की, पुण्यासारख्या ठिकाणी

आपला स्वतंत्र व्यवसाय सुरू करून सरडे कुटुंबीयांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे. ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे.  यावेळी मकाईचे संचालक महादेवराव सरडे, रणजीत सरडे,  आदिनाथ कारखान्याचे चेअरमन धनंजय डोंगरे,  सुरसे, विजय निकत, मकाईचे संचालक नंदकिशोर भोसले, हडपसर परिसरातील, करमाळा तालुक्यातील राहणारे रहिवासी, कार्यकर्ते, हितचिंतक, मित्रपरिवार व सरडे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *