शेतकर्यांची ऊस बिल एप्रिल मध्ये देऊ म्हणून वेळ मारून नेऊन शेतकर्यांना केले एप्रिल फूल – हनुमंत मांढरे-पाटील

करमाळा तालुका मधील ऊस उत्पादक शेतकरी सभासद यांचे आर्थिक शोषण तालुका मधील मकाई सह. व भैरवनाथ शुगर या कारखानदारांनी  केले आहे. शेतकर्यांचा ऊस गाळप करून चार-पाच महीने झाले तरी ऊसाचे बिले अद्याप पर्यंत दिली गेली नाहीत. आज तालुक्यातील शेतकरी पूर्ण पणे उध्वस्त झाला आहे. मकाई चे चेअरमन दिग्विजय बागल यांनी मार्च महिन्यात आठवणीतील मामा या अनुषंगाने कृषी प्रदर्शन घेतले. त्या वेळी वेळ मारून नेण्यासाठी एप्रिल महिन्यात ऊसाचे बिल देऊ

आशी घोषणा करून तालुक्यातील शेतकर्यांना एप्रिल फुल केले. मकाई कारखाना आर्थिक परिस्थिती त्या संचालकांना माहित होती. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या ऊस वाहतूक  करार बारामती अॅग्रो ला केला व ऊस पण तिकडेच घातला मकाई सह. कारखाना संस्थापक चेअरमन आप्पासाहेब झांजूर्णे व स्व.दिगंबरराव बागल मामा यांनी पहिल्यांदा गाळप चालू केले. तेव्हा सलग तीन ते चार वर्ष उत्कृष्ट गाळप ऊस दर या बाबतीत अनेक जागतिक स्थरावर पुरस्कार मिळालेला कारखाना आज

आर्थिक अडचणीत कसा येतो? आज मकाई वरती एक ही साखर पोतं शिल्लक नाही. याचा अर्थ तुम्ही साखर विक्री केलेली  आसताना देखील ऊस बिल देत नाही.  शेतकर्यांया मुलांचे-मुलींचे लग्न पैसे अभावी खोळंबली आहेत. आर्थिक व्यवहार असतील ऊस बिल वरती आश्वासन दिले आहेत. परंतु कारखानदारांनी केलेल्या फसवणूक मुळे  आज शेतकरी पुर्ण पणे आर्थिक अडचणीत सापडला आहे. भैरवनाथ कारखाना हा तर मंत्र्याचा कारखाना आहे. ‘नाव मोठं लक्षण खोटं’ इतर

कारखान्यांना आर्थिक मदत केली म्हणून गवगवा करतात मग शेतकर्यांची देणी का देत नाही?  शेतकर्यांचे पैसे वापरायचे तेच पैसे फिरवायचे आणि मोठाडपण मिरवायचं आसे यांचे उद्योग आहेत. भैरवनाथ कारखाना अगोदर तालुक्यातील शेतकर्यांची ऊसाचे बिल द्यावे मग आदिनाथ ला मदत केली म्हणून सांगावे पैसे आमचे शेतकर्यांचे आणि नाव मात्र स्वतःचे असे असताना बचाव समितीने आदिनाथ बचाव चा गवगवा करून काय साध्य केलं आहे. बचाव समिती मधील प्रत्येक सदस्य हा कोणत्या ना कोणत्या स्थानिक राजकीय गटाचा पदाधिकारी कार्यकर्ता आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या नेत्याचे राजकारण टिकवायचं होतं ज्यांनी पवारांना विरोध केला त्यांनी  स्वतःचा ऊस पवाराच्या कारखाना देऊन मोकळे झाले आणि आता तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी उध्वस्त होताना शांतपणे हाताची घडी तोंडावर बोट या भूमिकेत आहेत. आवाज उठवला तर आपल्याला विधासभेचे तिकीट मिळणार नाही. ज्यांनी शेतकरी उध्वस्त केला आहे तो कारखाना मंत्री तानाजी सावंत चा आहे. त्यांच्या वरती सरकार मध्ये चांगल चालते मग त्या मुळे शांत बसलेले बर आशी भूमिका घेतली आहे. परंतु यांना माहित नाही तिकीट तानाजी सावंत ने दिले तरी मतदान करायला ते येणार नाहीत. मतदार हे तालुक्यातील शेतकरी आहेत याची जाणीव त्यांना असणं गरजेचं आहे. जो पर्यंत हे कारखानदार शेतकऱ्यांचे थकीत रक्कम जमा करत नाही तो पर्यंत यांना पुढील गाळपसाठी परवानगी देऊ नये. व शेतकर्यांची थकीत बिल रक्कम त्वरित खात्यात जमा करावी या मागणी साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने लवकरच सर्व ऊस उत्पादक शेतकरी यांना घेऊन साखर आयुक्त यांच्या कार्यालय समोर बेमुदत उपोषण करण्यात येणार  आसल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस करमाळा तालुका अध्यक्ष हनुमंत मांढरे-पाटील यांनी दिली आहे. त्या वेळी पूढे बोलताना माझा एक गुंठा ऊस नाही परंतु  आमची लढाई हि आर्थिक शोषित  अन्याय  झालेल्या शेतकर्यांना न्याय देण्या साठी शेतकर्यांच्या जीवावर त्यांच्या घामाच्या कष्टाच्या जोरावर ए. सी. गाडीतून फिरणार्यी कारखानदारांच्या विरोधात आहे.

…..

ज्याच एक टिपरू कारखान्याला जात नाही त्यांना ऊसाबाबतच अर्धवट ज्ञान आहे आम्ही शेतकरी आहोत सर्वच साखर कारखाने चालले पाहिजे ही आमची भावना शेतकऱ्यांना बिल मिळावे याबाबत चेअरमन दिग्विजय बागल स्वतः नियोजन करीत आहेत. परंतु हा एप्रिल महिना आहे. या महिन्यात बँकांना खुप सुट्ट्या आल्या आहे. यामुळे तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहे. मकाई लवकरच शेतकऱ्यांचे बिल देणार आहे. याबरोबर तालुक्यातील ही कारखाने देतील – संतोष देशमुख संचालक श्री मकाई सहकारी साखर कारखाना, करमाळा

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *