श्रीराम प्रतिष्ठान मार्फत गेले वर्षापासून रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांना मोफत दूध वाटप – संस्थापक अध्यक्ष गणेश चिवटे
करमाळा प्रतिनिधी
श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी गरीब मुस्लिम बांधवांना रमजान ईद निमित्त मोफत दूध वाटप करण्यात आले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करमाळा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी ए.पी.आय जगदाळे साहेब तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार जयंत दळवी, आश्पाक सय्यद, दिनेश मडके, विशाल परदेशी, सिद्धार्थ वाघमारे उपस्थित होते.


या कार्यक्रम प्रसंगी बोलताना ए.पी.आय जगदाळे म्हणाले की, श्रीराम प्रतिष्ठानचे कार्य हे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असून त्यांचे विद्यार्थ्यांना मोफत भात-भाजी वाटप व शहरातील निराधार वृद्ध नागरिकांना दोन वेळचे जेवण देणे हे कार्य खूप पुण्याचे व कौतुकाचे आहे.


यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस किरणजी बोकन यांनीही मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी श्रीराम प्रतिष्ठानचे सदस्य विलास आबा जाधव, रामभाऊ ढाणे, महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव, चंद्रकांत कांबळे सर, समीर शेख, सुरज शेख, मस्तान कुरेशी, ह. भ. प. रघुनाथ काळे महाराज, वंजारवाडीचे विद्यमान सरपंच

प्रवीण बिनवडे, युवराज किरवे, गजराज चिवटे, दीपक सवालके, गणेश किरवे, जयंत काळे पाटील, शरद कोकीळ, संजय किरवे, गणेश गोसावी, भैय्या कुंभार, वसीम सय्यद, आकाश चिवटे आदी श्रीराम प्रतिष्ठानचे सदस्य व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.


गेले तेरा वर्षापासून रमजान ईद रोजी आम्ही दुध वाटप करीत आहोत गरीब मुस्लिम बांधवांची ईद साजरी झाली पाहिजे. कोरोना काळात सुध्दा ईद प्रसंगी दुध वाटप करण्यात आले होते. श्रीराम प्रतिष्ठान मार्फत आम्ही सामाजिक उपक्रमास प्रधान्य देत आलो आहे. भविष्यात ही प्राधान्य देत राहणार आहोत – गणेश चिवटे संस्थापक अध्यक्ष श्रीराम प्रतिष्ठान, करमाळा

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *