केंद्रस्तरीय शाळा पूर्वतयारीचा मेळावा भा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशालेत उत्साहात संपन्न..!!

करमाळा प्रतिनधी

दि. 21-04-2023 रोजी दिवशी प्रशासन अधिकारी अनिलजी बनसोडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मेळाव्याचे आयोजन केले होते. सर्व शिक्षकांना सकाळी 8:30 ते  10:30 पर्यंत शाळा पूर्व तयारी बाबत प्रशिक्षण देण्यात आले. 11:00 वाजता नवागत विद्यार्थ्यांचे हालगीच्या तालावर शाळेच्या गेट पासून मुख्याध्यापक ऑफिस पर्यंत रॅली काढण्यात आली. सुनंदा जाधव-माने मॅडम (मुख्याध्यापिका-नामसाधना प्राथ. विद्यामंदिर सेंट्रल स्कूल मुले-1) व व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष शुभांगीताई

कांबळे यांच्या हस्ते फित कापून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. माता सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शाळा पूर्वतयारीच्या कार्यक्रमात नवागत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक किट व गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. केंद्रसमन्वयक दयानंद चौधरी सर यांनी मेळाव्या संदर्भात मार्गदर्शन केले. नवीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, बौद्धिक व शारीरिक विकासासंदर्भात दोन गटात मिळून 14 टेबल मांडले होते. सर्व टेबलवर दोन शिक्षकांची नेमणूक

केली होती. प्रत्येक टेबलवर विद्यार्थ्यास वेगवेगळ्या कौशल्य संदर्भात माहिती विचारली जात होती. सर्व विद्यार्थ्यांनी प्रतिसाद चांगला दिला. हलकीच्या आवाजामुळे नवागत विद्यार्थी प्रफुल्लित व आनंदी उत्साहात होती. महिला शिक्षिकांनी रांगोळी अप्रतिम काढली होती. शाळा पूर्वतयारीसाठी रमेश नामदे सर व धनश्री उपळेकर मॅडम यांनी तज्ञ शिक्षक म्हणून काम पाहिले. नवागत विद्यार्थी त्यांचे पालक उपस्थित होते. तसेच सुनंदा माने मॅडम, माया दाते मॅडम, राजेंद्र जायभाय सर,

नवनाथ पारेकर सर, संतोष माने सर, धायतोंडे  हे सर्व मुख्याध्यापक व सर्व शिक्षक/शिक्षिका आणि वरिष्ठ लिपिक शिवदास कोकाटे भाऊसाहेब उपस्थित होते. सर्व मुख्याध्यापक/ मुख्याध्यापिका व शिक्षक/ शिक्षिका यांनी व्यवस्थितरित्या मेळावा पार पाडल्याबद्दल व महिला शिक्षिकांनी रांगोळी छान काढल्याबद्दल केंद्र समन्वयक चौधरी सर यांनी सर्वांचेच अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रम राऊत यांनी केले व बलभीम शिंदे सर यांनी आभार मानले..!! केंद्रस्तरीय शाळा पूर्वतयारीचा मेळावा भा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशालेत उत्साहात संपन्न..!!

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *