
केम येथे आमदार शिंदेच्या उपस्थित इफ्तार पार्टी
केम प्रतिनिधी संजय जाधव
केम येथे आज रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांनी जामा मज्जिद यांचे वतीने “इफ्तार पार्टी” आयोजित केली होती. यावेळी करमाळा-माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे यांनी भेट देऊन मुस्लिम बांधवांना ईद निमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी युवा नेते सागरराजे दोंड, बाळासाहेब देवकर, आनंद शिंदे, केम गावंचे जेष्ठ नेते विष्णु पारखे, अरुण लोंढे, सतिश अण्णा खानट दादा, डॉ. मधुकर कुर्डे, दिलीप दोंड, पारखे साहेब, बापू पारखे, आण्णासाहेब पवार, दत्तात्रय बिचितकर, विलास बिचितकर, किरण तळेकर तसेच मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


