
प्रा. डॉ. सचिन मोरे आदर्श शिक्षक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
करमाळा प्रतिनिधी
मन्वंतर सामाजिक संस्थेतर्फे दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार अहमदनगर विद्यालयाच्या इतिहास विभागाचे प्रा. डॉ.सचिन मोरे यांना नुकताच प्रदान करण्यात आला. प्रा. डॉ. सचिन मोरे हे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे, सावंत गल्ली, करमाळा यांचे सुपुत्र आहे. ज्येष्ठ समाजसेवक आणि नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड महाराष्ट्र युनिट महाराष्ट्राचे

अध्यक्ष रामेश्वर कलंबी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गेल्या 17 वर्षापासून अध्यापनाच्या क्षेत्रात कार्यरत असणारे डॉ. सचिन मोरे बहुजन आणि दिव्यांग मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करतात. या कार्याबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. यावेळी राज्य हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक डॉ. साताप्पा चव्हाण आणि ना.य

डोळे या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित असलेले प्रोफेसर डॉ. विजय कदम ही उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. सचिन मोरे म्हणाले की, कामाची दखल घेऊन कौतुक करण्यासाठी मोठ्या मनाची गरज असते. त्यासाठी मनाची श्रीमंती महत्त्वाचे ठरते. तसेच बहुजन आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहातील शिक्षणाचा मूलभूत अधिकार आहे.
