चिखलठाण वि. वि. कार्य. से. सोसायटी लि. चिखलठाण या संस्थेच्या चेअरमन पदी पाचव्या वेळेस विकास केरबा गलांडे यांचि बिनविरोध निवड

करमाळा प्रतिनिधी

चिखलठाण विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटी लि. चिखलठाण या संस्थेची सन 2022/23 ते 2027/28 या काळातील निवडणूक बिनविरोध पार पडली असून दि. 17/4/2023 रोजी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था करमाळा या कार्यालयात चेअरमन पदासाठी नवनिर्वाचीत संचालक मंडळाचे सभा मा. निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप तिजोरे यांच्या

अध्यक्षेतेखाली पार पडली असता चेअरमन पदासाठी विकास केरबा गलांडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड सर्वांनुमते करण्यात आली. सदर निवडीवेळी राजेंद्रकुमार बारकुंड (मा.जि.प. उपाध्यक्ष), केरु गव्हाणे (मा.व्हा. चेअरमन आदिनाथ सह. सा. कारखाना), बाळासाहेब रेगुडे (सचिव चिखलठाण वि. का.), सतीश बनसोडे (क्लार्क) व नवनिर्वाचित

संचालक मंडळ उपस्थित होते. नंतर गावांमध्ये ढोल, ताशा, तोफा यांच्या गजरात चिखलठाण या कोटलिंगाच्या नगरीत सलग पाच वेळेस चेअरमन पदी विकास गलांडे यांची निवड झाल्याने मिरवणूक काढून त्यांचे स्वागत करण्यात आले. गावात चिखलठाण गावचे मा. उपसरपंच दिनकर सरडे यांच्या हस्ते चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उर्वरित संचालक

मंडळाचा सन्मान राजाभाऊ बारकुंड यांच्या हास्ते करण्यात आला. यावेळी गावातील रामेश्वर गालांडे, शिवाजी पवार, रंगनाथ रोकडे, चंद्रकांत सुरवसे, विलास सरडे, मिलिंद गोमे, संजय गव्हाणे, समाधान गव्हाणे, अतुल जानभरे यांच्या सह बहुसंख्या समुदाय उपस्थित होता.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *