राजुरी येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली
राजुरी येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती प्रा. रामदास झोळ व सर्व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी लालासाहेब जगताप, डॉ. अमोल दुरंदे, श्रीकांत साखरे, एकनाथ शिंदे, राजेंद्र भोसले, बंडू शिंदे, आबा टापरे, विकास टापरे, नागेश गरुड, गणेश शिंदे, बापू साखरे, नवनाथ दुरंदे, हनुमंत जगताप इत्यादी उपस्थित होते. या

दिवशीच राजुरी या गावांमध्ये आय लव राजुरी या डिजिटल फलकाचे उद्घाटन प्रा. रामदास झोळ यांच्या हस्ते करण्यात आले व राजुरी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये रंगरंगोटी करण्यासाठी प्रा. रामदास झोळ यांनी पंधरा हजार रुपयांची मदत केल्याबद्दल जिल्हा परिषद शाळेमध्ये सत्कार करण्यात आला . प्रा. रामदास झोळ यांनी सर्वांशी संवाद साधताना सांगितले की,

शिका, संघटित व्हा व संघर्ष करा असे सांगितले. परंतु जर आपण चांगल्या प्रकारचे शिक्षण घेतले तर संघटित होण्याची व संघर्ष करण्याची वेळ येणार नाही असेही त्यांनी आवर्जून सांगितले. त्याचबरोबर व्यवसायिक शिक्षणाशिवाय पर्याय नाही असेही या ठिकाणी त्यांनी नमूद केले. त्याचबरोबर सध्याच्या सर्व विद्यार्थ्यांना सर्व सुखसोई आहेत. परंतु विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिकूल परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण केले व या भारत देशाचे संविधान तयार करण्यामध्ये मोठे योगदान दिले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *