मकाई जिंती वि. का. से. स. संस्था चेअरमन पदी मेरगळ व व्हा.चेअरमन पदी शेजाळ यांची बिनविरोध निवड
करमाळा प्रतिनिधी
दि. 18 रोजी मकाई जिंती विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.जिंती या संस्थेच्या चेअरमन पदी युवराज सोमनाथ मेरगळ व व्हा.चेअरमन पदी प्रकाश शेजाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शाम शंकर केसकर यांनी युवराज मेरगळ यांचे चेअरमन पदी नाव सूचवून त्यास अशोक मारूती वारगड यांनी अनुमोदन दिले. दत्तात्रय आजिनाथ गायकवाड यांनी व्हा. चेअरमन पदासाठी प्रकाश काशिनाथ शेजाळ यांचे नाव सूचविले व रामकृष्ण जनार्दन कुंभार यांनी अनुमोदन दिले.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उमेश बेंढारी यांनी काम पाहिले. बिनविरोध निवडीनंतर श्रीमंत शहाजीराजे राजेभोसले व सविताराजे भोसले वहिनीसाहेब यांनी चेअरमन युवराज मेरगळ व व्हा.चेअरमन प्रकाश शेजाळ यांच्यासह प्रमुखांनी सर्व नूतन संचालक मंडळ, शाम शंकर केसकर, दत्तात्रय आजिनाथ गायकवाड, रामकृष्ण जनार्दन कुंभार, अशोक मारूती वारगड, पंडित मच्छिंद्र रणदिवे,विद्याधर आदिनाथ धेंडे, दादासो तुकाराम कचरे, बजरंग कोंडीबा जाधव, तुकाराम शिवाजी गिरंजे, सुनंदा दादासो तावडे, जनाबाई दशरथ तानवडे यांचे सत्कार केले.
पॅनलचे मार्गदर्शक शिवाजीराजे भोसले, शंकर केसकर, गावडे सर, सोमनाथ तानवडे, अंकुश माळशिकारे, ज्ञानेश्वर भागडे, विलास मेरगळ, महेंद्र जाधव, भागचंद येडे, हरिदास माळशिकारे, तुळशिराम गुलमर, गणपत कचरे, मुरलीधर ओंभासे, उपसरपंच रमेश धेंडे, गणेश घोरपडे, रामहरी वारगड, पवार, यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.