
कोंढार चिंचोली ते डिकसळ जुन्या रेल्वे लाईनवरील ब्रिटिश कालीन पुलाच्या दुरुस्तीचे काम प्रगतीपथात – देविदास आप्पा साळुंके
जेआरडी माझा
कोंढार चिंचोली ते डिकसळ जुन्या रेल्वे लाईनवरील ब्रिटिश कालीन पुलाच्या दुरुस्तीचे काम प्रगतीपथात देविदास आप्पा साळुंके मा. सरपंच कोंढार चिंचोली व आर टी आय कार्यकर्ता. कोंढार चिंचोली ते डिकसळ या जुन्या रेल्वे लाईनवरील ब्रिटिश कालीन पुलाची दुरावस्था झाल्यानंतर व मोरी क्र. 8 ची पडझड व यापूर्वी पुलाचे पुर्व बाजूस पडलेले भगदाड या गोष्टी शासन दरबारी तसेच सोलापूर, पुणे ज़िल्यातील सर्व पत्रकार बंधू तसेच इलेक्टिक मीडिया, पोर्टलवर याची प्रसिद्धी व या कामासाठी कोंढार चिंचोली गावचे मा. सरपंच व आर टी आय कार्यकर्ता देविदास (आप्पा) साळुंके यांनी सतत लेखी तोंडी पाढपुरावा

मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री तसेच सा. बां. खात्याचे मुख्य सचिव साळुंके, उप सचिव वाळके मॅडम, आयुक्त, जिल्हाधिकारी, प्रांतधिकारी, तहसीलदार व पोलीस यंत्रणा, आर. टी. ओ. या सर्वांचा निदर्शनास आणून देऊन तशेच त्याच्याकडे लेखी पाढपुरावा करून डिकसळ पुलाची दुरुस्थी त्वरित युद्ध पातळीवर करून सर्व सामान्य लोकांची व विशेष म्हणजे शाळेंत जाणारी मुले, मुली यांची गैर सोय लक्षात घेऊन शासनाने त्वरित हलक्या स्वरूपाची फोर व्हीलर, टू व्हीलर वाहतूक पावसाळ्याचा अगोदर चालू करणे गरजेचे आहे. याकरिता मंत्रालयात सा. बां. खात्याचे सचिव साळुंके व रस्ते विभागाच्या वाळके मॅडम यांच्याकडे

सतत पाठपुरावा चालू आहे. कोंढार चिंचोलीचे मा. सरपंच यांनी जुन्या पुलाची दुर्घटना दि. 14/1/2023 रोजी झाली की दि. 18/1/2023 रोजी लेखी पत्रकार शासनाचे सर्व विभागाना करून पुलाचे गाभीर्य लक्षात आणून दिले व वेळोवेळी पत्रकारांच्या माध्यमातून बातम्या देऊन शाषनास जागे केले व जुन्या पुलाचा दुरुस्ती साठी 7.5 कोटीचे दुरुस्तीचे अंदाजपत्रक करणेस भाग पाढले व सध्या सदर अंदाजपत्रक मंत्रालयात मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. त्यास साधारपणे 15 दिवसांनी मान्यता मिळेल कारण सध्या अर्थ संकल्प अधिवेशन चालू आहे त्यामुळे सर्व अधिकारी कामात व्यस्थ आहेत त्यासाढी पुढील आठवड्यात

मंत्रालयात जाऊन प्रत्याक्षात गाठ घेणार आहे. साधारणपणे मे 2023 ला निविदा निघून कामास सुरवात होईल व काम मे महिन्यात पूर्ण होवून जून महिन्यात हलकी फोरव्हीलर वाहतूक निश्चित पणे चालू होईल असे सांगितले. तर नवीन पर्यायी पुलाविषयी साळुंके यांनी सांगितले की सदर टेंडची मुदत 20 मार्च पर्यंत दिली असून त्याचे टेंडर 23 मार्च ला ओपन होऊन तेही काम शासन स्तरावर प्रगती पथात आहे. त्यामुळे पश्चिम भागातील अनेक कार्यकर्त्यांचे फोन येत असल्याचे व पुलाविषयी माहिती देताना ही हकीकत सांगितली व त्यांनी लोकांना कळकळीची विनंती केली की नवीन पुलाचे काम ही प्रगतीत आहे व तो पूल होईपर्यंत जुन्या पुलावरून हलकी वाहतूक त्वरित दुरुस्ती झाली की दळणवळण चालू करावे लागेल व शाळेत जाणाऱ्या मुलाची गैरसोय दूर करावयाची आहे तेव्हा लोकांनी फक्त दोन महिने कळ काढावी, शासन आपल्यासाठी प्रयत्न करीत त्यांना सहकार्य करून आपला पूल वाचवू असे नम्र आवाहन साळुंके यांनी केले आहे. तो पर्यंत जड वाहतूकीचा किव्हा हलक्या वाहतूकीचा आग्रह धरू नये. कोरोना काळात आपण जसे सहकार्य शासनास केले तसे करावे ही विनंती केली व याचबरोबर सार्वजनिक बांधकाम खात्याचे उप अभियंता करमाळा उबाळे, वाघ तसेच कार्यकारी आभियंता, अधीक्षक अभियंता, मुखभियंता, सचिव, उपसचिव या सर्वांचे आभार मांडले व करमाळा, इंदापूर, दौंड, भिगवण, डिकसळ, खानोटा, पारेवाडी पत्रकारांचे आभार व्यक्त करून डिकसळ पुलाविषयीचा खुलासा केला.