
जुनी पेन्शन मिळावी म्हणून करमाळा नगरपरिषद कर्मचारी बेमुदत संपावर
करमाळा प्रतिनिधी
जुनी पेन्शन मिळावी म्हणून बेमुदत संप करमाळा नगरपरिषद कर्मचारी यांनी केला आहे.
विषय जुनी पेन्शन मिळावी, कंत्राटी कर्मचाऱ्यांना समान काम, समान वेतन,अनुकंप भरती त्वरित करावी,दहा वीस तीस वर्षाची कालबद्ध पदोन्नती त्वरित लागु करावी आदी मागण्यासाठी संपावर आहे. यावेळी महादेव कांबळे सहसचिव भा. म. संघ, प्रदीप शिंदे अध्यक्ष भारतीय मजूर संघ, अनुप कांबळे अध्यक्ष अखिल भारतीय कर्मचारी संघ, सुमेघ (दादा) कांबळे, नंदकुमार कोरपे, विकास पवार, नवनाथ कांबळे, सुशांत कांबळे, शालन कांबळे, माया लालबेग, स्वाती कांबळे, अण्णा कांबळे, लोकेश आलाट, रमेश कांबळे, सतीश खरात, सुनील कांबळे आदिजण संप करीत आहे.

