गजानन स्पोर्ट्स करमाळा आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत बार्शी संघ विजयी उपविजेता गजानन स्पोर्ट्स क्लब

करमाळा प्रतिनिधी

गजानन सोशल अॅण्ड स्पोर्ट्स क्लब करमाळा यांच्यावतीने सालाबादाप्रमाणे जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सदर स्पर्धा टेनिस बॉलवर होत्या. या स्पर्धेला जिल्हाभरातून 28 टीम सहभागी झाल्या. मंगळवारी सायंकाळी 5 वा. गजानन विरुद्ध बार्शी या 2 संघामध्ये फायनल मॅच झाली असून बार्शी संघाने विजेते पद घेतले आहे तर गजानन संघाने उपविजेते पद मिळवले आहे. तसेच तृतीय क्रमांक टेंभुर्णी संघास मिळाला असून चतुर्थ क्रमांक कुगाव या संघास मिळाला आहे.

 मॅन ऑफ द सिरीज बक्षीस सायकल मिलिंद दामोदरे व उत्कृष्ट खेळाडू बापू सावंत आणि सचिन गायकवाड या दोघांना देण्यात आले. मॅन ऑफ द मॅच शिंदे यांना देण्यात आले.

 सामना बघण्यासाठी करमाळा शहरातील युवा क्रिकेट प्रेमींनी बरीच गर्दी केली होती. शेवटचा फायनल सामना फार अटीतटीचा व रोमांचक झाला. सदर क्रिकेट स्पर्धा बक्षीस वितरण करमाळा नगरीचे  नगरसेवक संजय सावंत, अतुल भैया फंड, नितीन घोलप, जगदंब स्पोर्ट्सचे कानगुडे, अभिजीत भाई पाटील, समीर बागवान, चेतन ढाळे, आरशाद शिकलकर, इर्शाद चिखलकर, अक्षय ढाळे, सरपंच योगेश सोरटे, सामाजिक कार्यकर्ते सचिन भैया गायकवाड, सोनू मल्होत्रा, श्रीकांत ढवळे, डॉ. गजेंद्र विभुते, संतोष व्यंगलम सुनील फुलारी अशा बऱ्याच मान्यवरांनी हजेरी लावली व सर्वांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा

कार्यक्रम माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे यांनी केला व सर्व क्रिकेट प्रेमींचे व  मान्यवरांचे गजानन सोशल अॅण्ड स्पोर्ट्स तर्फे आभार मानले. गजाननच्या सर्व सदस्यांनी सदर क्रिकेट स्पर्धा पार पाडण्यासाठी अर्थात परिश्रम घेतले. संघाचे कर्णधार अमित बुद्रुक, मुसा दारूवाले, अल्ताफ दारुवाले, बापू सावंत, रोहित परदेशी या सदस्यांनी सदर स्पर्धा पाडण्यासाठी परिश्रम घेतले. तसेच येणाऱ्या काळात नक्कीच करमाळा शहरात एक भव्य अशा नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्याचा मानस गजानन सोशल तर्फे करण्याचा प्रयत्न करू असे माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे यांनी सांगितले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *