
जुनी पेन्शन योजना लागू व्हावी त्या संप बाबतचे निवेदन
करमाळा प्रतिनिधी
1 नोव्हेंबर 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी. यासाठी सर्वच विभागाच्या प्रमुख संघटनांनी 14 मार्चपासून बेमुदत संप पुकारलेला आहे. या संपबाबतचे निवेदन करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या वतीने तहसीलदार साहेब करमाळा व गटविकास अधिकारी साहेब पंचायत समिती करमाळा यांना देण्यात आले. त्यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्ह्याचे नेते प्रताप काळे, चंद्रहास

चोरमले, रमेश कोडलिंगे, जालिंदर यादव व आदर्श शिक्षक समितीचे तालुका अध्यक्ष प्रवीण घाडगे व नितीन व्हटकर त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे जिल्ह्याचे नेते तात्यासाहेब जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष साईनाथ देवकर, तालुका अध्यक्ष अरुण चौगुले, सचिन बागल, चंद्रकांत रोडे, नितीन काळे, राजेन्द्र दणाने, अमोल टोणे हे उपस्थित होते.

