दहिगाव उपसा सिंचन योजनेचे जनक हे केवळ आणि केवळ दिगंबर मामा बागल हेच असून या दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या मंजुरीचा आणि केलेल्या कार्यवाहीचा मी  स्वतः साक्षीदार असल्याचे राज्याचे माजी मंत्री दिलीप सोपल यांनी आज करमाळा येथे सांगितले. आज करमाळा येथे राज्याचे माजी मंत्री लोकनेते दिगंबरराव बागल कृषी महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात दिलीप सोपल बोलत होते, आपल्या भाषणात त्यांनी माझे सन्मित्र दिगंबरराव बागल मामा यांनी करमाळा तालुक्यातील शेत जमिनीला पाणी मिळवून देण्यासाठी दहिगाव उपसा सिंचन योजना तात्कालीन उपमुख्यमंत्री

गोपीनाथरावजी मुंडे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा व आग्रह धरून या योजनेला मंजुरी मिळवून दिली आणि त्या कामाला गतीही दिली. त्यामुळे करमाळा तालुक्यातील पूर्व भागातील शेतीला शाश्वत पाणी मिळू शकला आहे. वास्तविक पाहता करमाळ्यासारख्या दुष्काळी भागाला दहिगाव उपसा सिंचन योजने शिवाय पर्याय नाही हे स्वर्गीय मामांनी त्यावेळी ओळखले होते, त्यामुळे स्वतः मामांनी पुढाकार घेऊन या योजनेला मंत्रालयातून सातत्याने पाठपुरावा करून ही योजना मंजूर करून घेतली. वास्तविक पाहता दहिगाव योजनेचे स्वर्गीय मामा हे जनक तर आहेतच परंतु कुकडी कॅनॉल मधून पाणी आणण्यासाठी वेळप्रसंगी मामांनी कॅनॉल पट्टीला रात्रंदिवस स्वतः फिरून कॅनॉलचे पाणी मांगी तलावात आणि कुंभेज तलावांमध्ये कशा पद्धतीने लवकर येईल यासाठी कष्ट घेतले होते. आज या दोन्ही योजनांमुळे करमाळा तालुक्याला शाश्वत पाणी मिळू शकले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *