
एक दिवसा साठी शुभेच्छा नको तर दररोज सम्मानाने वागवा !
जागतिक महिला दिना निमित्त निलीमा पुंडे म्हणाल्या. आज महिला दिना निमित्त “मैत्रिणी ग्रुप, किल्ला विभाग करमाळा” यांच्या वतीने श्रीराम प्रतिष्ठान येथील निराधार महिलांना लाडू चे वाटप करण्यात आले व त्यांचा महिला दिन गोड करण्यात आला.

श्रीराम प्रतिष्ठान चे कार्य हे प्रशंसनीय तर आहेच पण प्रेरणादायी सुद्धा आहे. त्यांच्या या पुण्य कार्यात मैत्रिणी ग्रुपचा खारीचा वाटा. फक्त निराधारांना अन्नदानच नव्हे तर प्रतिष्ठान ने गेल्या महिन्यात २१ जोडप्यांचे सामुदायिक विवाह खूप थाटात संपन्न केला. त्यांच्या कार्याला सलाम. मैत्रिणी ग्रुप मधील निलीमा पुंडे, कोमल ठेंगडे, सरोजिनी पाटील, सुजाता मनसुके, कल्पना जगताप,पुजा मनसुके, वैशाली कराड, शैलजा मेहेर, रेखा वीर, अनिता चोरगे, वैशाली रंदवे, संगीता मुसळे, अर्चना पानसांडे या उपस्थित होत्या.

