
कमलाभवानी कारखान्याने पेमेंट द्दावे आत्महत्या करण्यास वेळ आणु नये -शेतकरी गव्हाणे
करमाळा प्रतिनिधी
कमलाभवानी कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पेमेंट अद्याप दिले नाही. त्यांच्या मुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे, अशी माहिती पोफळज येथील शेतकरी प्रदिप अंगद गव्हाणे यांनी दिली आहे.
डिसेंबर मध्ये ऊस गेला आहे. त्याची पेमेंट अद्यापही नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. सावकाराकडून पैसे काढले आहेत ते तागादा लावत आहेत.

पैसे नसल्यामुळे खत दुकानदार खत देत नाही, या येणाऱ्या पैशाच्या भरोशावर आम्ही सर्व शेतकरी बसलो आहे. संबंधित चेअरमन, संबंधित विभागाला फोन लावला असता उचलत नाही, पेमेंट बाबत काही बोलत नाही, शेतकऱ्यांनी जगावे कसे हे समजत नाही.
अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे तरी कमला भवानी शुगरचे चेअरमन विक्रमसिंह शिंदे यांनी पेमेंट द्दावे. शेतकऱ्यांना त्यांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त करू नये असे पोफळज येथील शेतकरी प्रदिप अंगद गव्हाणे यांनी सांगितले आहे.

……
यासंदर्भात चेअरमन विक्रमसिंह शिंदे यांना फोन लावला असता त्यांनी उचलला नाही, अधिकारी रोकडे यांना फोन लावला असता याबाबत चेअरमन लवकरच नियोजन करणार आहे असे सांगितले.