श्री मकाई साखर कारखान्याची शेतकऱ्यांची देणी एप्रिलमध्ये देण्यात येणार आहे विरोधकांनी याचे राजकारण करू नये – संचालक संतोष देशमुख
करमाळा प्रतिनिधी
श्री मकाई साखर कारखान्याची शेतकऱ्यांची देणी एप्रिलमध्ये देण्यात येणार आहे विरोधकांनी याचे राजकारण करू नये अशी माहिती संचालक संतोष देशमुख यानी दिली आहे.
करमाळा तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची गळीत हंगाम 2022 – 23 मधील 4- पंधरवड्याची ऊस बिलाची रक्कम ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना देणे बाकी आहे. सदरची देय असलेली ऊस बिलाची रक्कम उपलब्ध करण्यासाठी चेअरमन दिग्विजय बागल यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळांनी प्रयत्न करून कर्ज मंजूर करून घेतलेले आहे. सदर

कर्जाचे वितरण बँकेच्या सी.डी. रेसिओ (क्रेडिट डिपॉझिट रेसिओ) वाढवून औद्योगिक कर्जाची मर्यादा या आर्थिक वर्षात समाप्त झाल्यामुळे या मंजूर झालेल्या कर्जाचे वितरण एप्रिलमध्ये होईल. कर्ज वितरण झाल्यानंतर तात्काळ ऊस बीलाची सर्व थकीत रक्कम एप्रिलमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल. या गळीत हंगामामध्ये ऊस तोडणी वाहतूक यंत्रणेअभावी अपेक्षेपेक्षा कमी झालेले ऊस गाळप देशांतर्गत उतरलेले साखरेचे दर व कारखान्यांमध्ये केलेली नवीन सुधारणा यामुळे ऊस

बिलाची रक्कम वेळेत अदा करण्यास विलंब झालेला असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांनी पुर्वी काही दिवसापूर्वी दिली होती यावेळी संचालक मंडळातील सर्व सदस्य आम्ही उपस्थित होतो. कारखाना सर्व शेतकरी हिताचे निर्णय घेत आहे विरोधकांनी राजकारणाच्या वेळेस राजकारण करावे विणाकारण विरोध करू नये असेही अखेर संचालक संतोष देशमुख यांनी सांगितले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *