मांगी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत दूध पंढरी डेअरीचे उद्घाटन   

 सोलापूर जिल्हा दूध उत्पादक संघ संचलित आमदार संजय मामा शिंदे द सहकारी संस्था मर्यादित मांगी येथे सामाजिक कार्यकर्ते श्री सुजित तात्या बागल यांनी नव्याने सुरू केलेल्या दूध डेअरी व दहा गावातील संघ केंद्राचे उद्घाटन सोहळा सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन मा रणजीतसिंह  शिंदे व विठ्ठल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक यशवंत( भैय्या) शिंदे यांचे शुभहस्ते तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात पार पडला डेअरी तर्फे शेतकऱ्यांना  23 गाईचं वाटप करण्यात आले होते उद्घाटनाच्या पहिल्याच  दिवशी तब्बल दीडशे लिटर दूध या  डेअरीमध्ये जमा झाले, यावेळी बोलताना विविध मान्यवरांनी आपल मनोगत व्यक्त केले, यावेळी सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन माननीय रणजीतसिंह शिंदे यांनी मांगी पंचक्रोशीतील जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी या डेअरीला दूध देऊन सहकार्य करावे तसेच दुधाच्या गुणवत्तेनुसार आम्ही जास्तीत जास्त भाव देण्याचा प्रयत्न करू असे आव्हान श्री शिंदे यांनी केले तसेच दुसऱ्या डेरी प्रमाणे उचल देऊन दूध

उत्पादकांना डेअरीला बांधील ठेवण्यापेक्षा त्यांच्या दुधाला आम्ही जास्तीत जास्त भाव  देणार आहोत, असे आश्वासन दिले  तसेच या कार्याबद्दल श्री सुजित तात्या बागल यांचं विशेष कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी डॉक्टर पाटील व राजीव सरोळीकर यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध वाढीबद्दल विशेष मार्गदर्शन केले  यावेळी उद्धव दादा माळी , डीसीसी बँकेचे आवटे साहेब, शाखाधिकारी माने साहेब अधिकारी श्री भडंगे श्री चव्हाण श्री नाईकनवरे श्री खंडागळे संचालक  चव्हाण ,व मांगी पंचक्रोशीतील दूध उत्पादक शेतकरी जातेगाव येथील काशिनाथ कामठे रमेश खरात ,प्रवीण शिंदे गुरुजी बापूराव गायकवाड, पुनवर येथील बापू नरसाळे , वडगाव येथील शेगडे, काळे, पोचऱ्यातील विठ्ठल शिंदे पिंपळवाडी येथील बापू काळे खडकी येथील अंगद शिंदे रोशेवाडी येथील आदिनाथ मोरे, मांगी येथील दीपक बागल ,संभाजी बागल, पप्पू शिंदे, रतन शिंदे ,अभिमान अवचर नंदकुमार नरसाळे, पोपट नरसाळे ,हनुमंत बागल, प्रताप बागल विष्णू बागल, दिवाण बागल, पोपट धुमाळ ,गणेश नरसाळे स्नेहल अवचर अण्णा बागल वैभव बागल, राजेंद्र मुरकुटे प्रेम चव्हाण, ऋषिकेश शिंदे नवनाथ अवचर ,ऋषिकेश बागल आधी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते,

शेवटी आभार प्रदर्शन अनिल बागल यांनी केले यावेळी मांगी ग्रामस्थांतर्फे मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *