मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षामुळे कॅन्सर रुग्णाला एक लाखाची मदत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले धन्यवाद

करमाळा प्रतिनिधी
फिसरे तालुका करमाळा येथील लक्ष्मण जगन्नाथ पवार कर्करोगाने ग्रस्त असलेल्या रुग्णाला वैद्यकीय उपचारासाठी एक लाख रुपयांचा मदतीचा आदेश मिळाला आहे.

हा कर्करोग आणि ग्रस्त असल्यानंतर फिसरे येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप नेटके, विजय अवताडे, प्रदीप धोंडे, नवनाथ पवार, हनुमंत रोकडे, झुंबरलाल पाटील, औदुंबर माकोडे, सुनील काळे, शिवाजी काकडे पुढाकार घेऊन मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडे ऑनलाईन अर्ज केला. हा अर्ज केल्यानंतर 48 तासातच या रुग्णाच्या दाखल असलेल्या हॉस्पिटलच्या अकाउंट वर एक लाख रुपये उपचारासाठी जमा झाले आहेत.

या एक लाख रुपयांच्या आदेशाची प्रत सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे त्यांना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख दीपक पाटणे सह कक्ष प्रमुख शिवकुमार चिवटे, कार्यालय संपर्कप्रमुख रोहित वायभासे, कोळगाव शिवसेना शाखा अध्यक्ष नागेश शेंडगे यांच्या उपस्थितीत आदेश देण्यात आला.

संदीप नेटके म्हणाले की, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाने कोरोना काळात सुद्धा जवळपास दहा इंजेक्शन आम्हाला मोफत दिले होते. आज या रुग्णाला एक लाखाची मदत मिळाली आहे, यामुळे आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फिसरे ग्रामस्थांच्या वतीने धन्यवाद देत आहोत.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षा मदत मिळवण्यासाठी करमाळा स्वतंत्र कार्यालय उघडण्यात आले असून ज्यांना वैद्यकीय मदतीची गरज आहे त्यांनी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आव्हान जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी केले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *