
संभाजी ब्रिगेड जेऊर यांच्यावतीने संत गाडगे बाबा यांची जयंती
जेऊर प्रतिनिधी
संभाजी ब्रिगेड जेऊर यांच्यावतीने संत गाडगे बाबा यांची जयंती संभाजी ब्रिगेड कार्यालयात मोठ्या उत्साहात मध्ये साजरी करण्यात आली यावेळी बोलताना संभाजी ब्रिगेड पुणे विभागीय अध्यक्ष नितीन खटके म्हणाले गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिलह्यातील शेणगाव येथे झाला त्यांचे पुर्ण नाव डेबुजी झिंगराजी जानोरकर होते. अज्ञात, अंधश्रद्धा अनिष्ट रूढी

परंपरा विरोध कीर्तनाद्वारे लोक जागृती चोरी करू नका, कर्ज काढू नका, व्यसनाच्या अजून होऊ नका देवा धर्माच्या नावाने प्राण्यांची हत्या करू नका, देव दगड-धोंड्यात नसून माणसात आहे अस्पृश्यता पाळु नका.घरदार सोडुन अवघ्या समाजाचा संसार सुधारण्यासाठी ते घराबाहेर पडले गावात कोणाचे काही अडले नडले कोठेही काही काम करावयाचे असले की गाडगे महाराज स्वत:हुन पुढे येत सार्वजनिक हिताची कामे सर्व जनांनी एकवटुन केली पाहिजेत हा धडा त्यांनी मिटल्यातोंडी

गावकऱ्यांना शिकवला व महाराष्ट्र ही संतांची पुण्यभुमी आहे अशा या पुण्यभूमीत अनेक संत-महात्मे होऊन गेले संत गाडगे बाबा हे त्यापैकी एक असे ते म्हणाले यावेळी उपस्थित संभाजी ब्रिगेड कार्य अध्यक्ष बालाजी गावडे बाळासाहेब कर्चे संभाजी ब्रिगेड जेऊर शहरअध्यक्ष अतुल निर्मळ आदिनाथ माने पिंटू जाधव सुहास शिंदे सागर बनकर रंजीत कांबळे अभिजीत म्हमाणे रोहन गरड वैभव मोहिते सागर लोंढे अजित उपादे दादासाहेब लोंढे अविनाश घाडगे सोमनाथ शिरसकर सागर गरड अनिकेत दळवी गणेश मोहिते इत्यादी उपस्थित होते.
