स्वाभिमानी बळीराजा रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या मागणीला यश आले
करमाळा प्रतिनिधी
स्वाभिमानी बळीराजा रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या मागणीला यश आले करमाळा तालुक्यातील कृषी पंपाची लाईट तोडण्यात आली होती आठ ते दहा दिवस झाले शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास जाण्याची शक्यता निर्माण झाली होती सर्व शेतकरी संघटनेने महावितरण कंपनीला विनंती केली होती की शेतकऱ्यांची कृषी पंपाची लाईट पुरवत करावी न लाईट जोडल्यास सर्व शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाच्या आंदोलन केले जाईल असा इशारा दिला होता करमाळा

महावितरण कंपनीचे अभियंता श्री सुमित जाधव साहेब यांनी सर्व शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली व या बैठकीतून मार्ग निघाला करमाळा तालुक्यातील कृषी पंपाची लाईट पुरवत चालू झाली शेतकरी वर्गामध्ये मध्ये आनंद व्यक्त केला जात आहे यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र गोडगे बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब सुपनवररयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष शिवशंकर जगदाळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके स्वाभिमानीचे युवा तालुकाध्यक्ष अमोल घुमरे बळीराजा शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष शिवाजी बनकर सर्व शेतकरी संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *