करमाळा प्रतिनिधी

सभासद शेतकरी कामगार यांचे तहसील कार्यालय करमाळा येथे अतिशय शांततेच्या मार्गाने निवेदन देण्यात आले. आदिनाथ सहकारी साखर कारखाना बोत्रेसारख्या व्यक्तीच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव आम्ही सर्व करमाळावासीय हाणून पाडू. आमच्या शांततेचा प्रशासनाने गांभीर्यपूर्वक विचार करून आदिनाथ कारखान्यातील कामगारांचे वेतन आणि सभासदांचे मालकी हक्क आबाधित राहण्यासाठी योग्य ती भूमिका घेणे गरजेचे आहे अन्यथा आम्ही यापुढे अजून ताकतीने आंदोलन करणार आहोत. हा सरकारला इशारा आहे. बोत्रे यांनी आधीच त्यांच्या कारखान्याची शेतकऱ्यांची उसाचे बिल दिली नाहीत तरीसुद्धा सहकार क्षेत्रातील कारखाने कवडीमोल दरात या बोत्रे पाटलाला मिळतेतच कसे.?

जर उद्या सहकार क्षेत्रातील बोत्रे हे विजय मल्ल्या निघाले तर याला जबाबदार महाराष्ट्र शासन असणार का असा सवाल करमाळा तालुक्यातील प्रत्येक सभासद शेतकरी विचारत आहे. ज्याप्रकारे कारखाना विकत जात असताना बँकेची देणे दिली जातात त्याच प्रकारे सभासदांचे शेअर्स भाग भांडवल आणि कामगारांच्या थकीत पगारीवर एकही शब्द बोत्रे पाटलांनी काढलेला नाही. मग नुसता कारखाना कवडीमोल दरात त्यांना दिला कसा जातो. जर बोत्रे पाटलाला कारखानाच द्यायचा असेल तर प्रशासनाने त्यांना दहा-पंधरा वर्षाच्या करारासाठी द्यायचा असतो. तुम्ही एकाही सभासदाला विचारात न घेता कारखान्याची विक्री प्रक्रिया का केली. कारखाना निलाव होत असताना त्याची वृत्तपत्रा मध्ये जाहिरात द्यावी लागते तसेच कारखान्याच्या गेटवर नोटीस चिटकावि लागते हा कोणताच प्रकार आदिनाथ बाबतीत घडलेला नाही हे स्पष्ट कोर्टाने नमूद केलेले आहे. जर एवढं घडत असेल तर याच्यावर तालुक्यातील एकही नेता मूग गिळून गप्प का आहेत.

इथून पुढची लढाई आम्ही प्रत्येक गावात जाऊन शेतकरी सभासद कामगार यांना अजून ताकतीने एकत्र येण्याचे आवाहन करणार आहोत. आमची प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की, हा कारखाना एक तर धोत्रे पाटलाला देणार असल तर तो करारावर द्यावा, विक्रीसाठी नाही. जर निलाव प्रक्रिया करत असाल तर सभासदांचे शेअरचे पैसे, कामगारांच्या पगारी कायद्याने देणे बंधनकारक आहे. आदिनाथ कारखाना वाचवण्यासाठी गेल्या चार महिन्यापासून मी शेतकरी पुत्र उदयसिंह देशमुख, संचालक मंडळ असतील तालुक्यातील प्रत्येक नेत्यांना सांगत होतो, कारखाना निलावत चालला आहे जर येत्या काळात कोणत्याही नेत्यांनी यात भाग घेतला नाही तर आदिनाथ कारखाना हे सहकाराचे मंदिर आहे आणि ते मंदिर वाचवण्यासाठी आम्ही कामगार शेतकरी सभासद आमची लढाई आम्ही स्वतः लढण्यास तयार आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *