
करमाळा प्रतिनिधी
सालाबादप्रमाणे यंदाही श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी श्री संत सेना महाराज समाज मंदिर, गणेश नगर, करमाळा येथे पुण्यतिथी व कीर्तनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडणार आहे.

यावेळी ह.भ.प. विवेकानंद मंजरतकर महाराज यांचे कीर्तन दुपारी १२ वाजता होणार आहे. तसेच विठ्ठल मंदिर भजनी मंडळ यांचीही उपस्थिती राहणार आहे.
या धार्मिक कार्यक्रमास नाभिक समाज बांधवांनी सहकुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.