
निंभोरे येथे केशव काळदाते यांचे माध्यमातून रोटरी क्लब यांचेकडून 3 लाख रु किंमतीचा कलर निंभोरे हायस्कूल ला मोफत पुरवठा
निंभोरे गावचे सुपुत्र आणि पुणे येथे कार्यरत असलेले युवा उद्योजक मा.श्री.केशव साहेबराव काळदाते हे रोटरी क्लब ऑफ डायनामिक चे डायरेक्टर आहेत.रोटरी क्लब मार्फत अनेक सामाजिक व शैक्षणिक उपक्रम घेतले जातात. तसेच केशव काळदाते हे सरपंच रविदादा वळेकर यांचे चांगले मित्र आहेत. रोटरी क्लब मार्फत आपल्याला गावात काहीतरी करायचं आहे, असं त्यांनी कानावर घालताच सरपंच यांनी श्री छत्रपती संभाजी विद्यालय निंभोरे येथे कलर देणे गरजेचे असल्याचे सुचविले.
तेव्हा तातडीने केशव काळदाते यांनी कागदपत्रे मागवून घेत पत्रव्यवहार केला आणि अंदाजे 3 लाख रु किंमतीचा कलर रोटरी क्लब कडून मंजूर करून घेतला. 15 ऑगस्ट च्या आधी कलर देण्याचे काम पूर्ण झाले.त्यामुळे विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ व शिक्षक यामध्ये उत्साह पहावयास मिळाला.
आज श्री छत्रपती संभाजी विद्यालय निंभोरे येथे स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात केशव काळदाते हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच रविदादा वळेकर उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात काळदाते यांनी स्पोर्ट्स मध्ये चमकणाऱ्या मुलांसाठी अनेक बक्षिसे जाहीर केली.
यावेळी सरपंच रविदादा वळेकर, केशव काळदाते,शाळेचे संस्थापक अध्यक्ष अरुणदादा वळेकर, माजी उपसरपंच शहाजीभाऊ काळदाते, शशिकांत वाघमारे साहेब, प्रदीप गाडे साहेब,महेश वाघमारे, पत्रकार धर्मा दळवे,अक्षय वाघमारे, प्रदीप जगताप, परमेश्वर वळेकर,बापू कन्हेरे, मधुकर तनपुरे,भीमराव काळदाते, हनुमंत वाघमारे,विलास वळेकर, अशोक वळेकर,विश्वास वरकड, शिक्षक, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, पदाधिकारी, गावातील युवा कार्यकर्ते, छत्रपती ग्रुप व आर. व्ही. ग्रुप चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
