
उज्ज्वलकुमार माने यांना राज्यस्तरीय अहिल्यादेवी संशोधन लेखन पुरस्कार
जेआरडी माझा
सोलापूर येथील पत्रकार व लेखक उज्ज्वलकुमार माने यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शोध संस्थान अंबड या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर संशोधन लेखन पुरस्कार चांदवड (जि. नाशिक) येथे

होळकर राजघराण्याचे युवराज श्रीमंत यशवंतराव होळकर महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस, संस्थेचे मानद सचिव जवाहरलाल आबड, इतिहास संशोधक डॉ.

देविदास पोटे, प्राचार्य महादेव कोकाटे, तळोदा संस्थानचे जहागिरदार अमरजितराजे बारगळ, संयोजक रामभाऊ लांडे, डॉ. दिलीप बलसेकर, महिला व बालकल्याण अधिकारी पंडित वाकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
