करमाळा तालुका खरेदी विक्री संघाची निवडणुक बिनविरोध, जगताप गटाचे वर्चस्व : – करमाळा तालुका सह .कृषी खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक निवडणुक १५ जागांसाठी १५ अर्ज आल्याने बिनविरोध पार पडली आहे . अर्ज दाखल करणाऱ्यांमधे माजी आमदार जयवंतराव जगताप, शंभुराजे जगताप, महादेव कामटे, महादेव डुबल,गोरख (दादासाहेब ) लबडे, रामदास गुंडगिरे, हनुमंत ढेरे, जनार्धन नलवडे, मज्जिद खान, शहाजी शिंगटे, सर्जेराव घरबुडवे, किशोर भगत, महेश कांबळे, सौ .नंदिनी जगताप, सौ .मनिषा धोंडे यांचा समावेश आहे . निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक दिलिप तिजोरे

कामकाज पाहत आहेत . खरेदी विक्री संघावर स्थापने पासून जगताप गटाचे वर्चस्व आहे . करमाळा तालुका खरेदी विक्री संघाची माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप यांनी स्थापना केली असून आजवर कै .नामदेवराव जगताप, माजी आमदार जयवंतराव जगताप, माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी चेअरमन पदाची धुरा सांभाळली आहे . आता जगताप गटाचे युवानेते शंभुराजे जगताप यांची संचालक मंडळात वर्णी लागल्यामुळे त्यांची चेअरमन पदी निवड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे . एप्रिल २०१९ मधे लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून आपल्या राजकीय जीवनाचा श्रीगणेशा करणाऱ्या शंभुराजे जगताप यांनी या निमित्ताने सहकार क्षेत्रात राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आहे .

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *