
मोफत चष्मे वाटप उत्कृष्ट सामाजिक उपक्रम-किरण सावंत
करमाळा प्रतिनिधी
डोळे तपासणी करून चष्मा खरेदी करण्यासाठी किमान एक हजार रुपये खर्च येतो मात्र आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक हजार रुग्णांची तपासणी करून त्यांना चष्मे मोफत देण्यात आले ही बाब कौतुकास्पद असून असे सामाजिक उपक्रमामुळे सर्वसामान्य जनतेला मदत होऊ शकते असे मत भैरवनाथ शुगर विहाळ कार्यकारी संचालक किरण तात्या सावंत यांनी व्यक्त केले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य शिबीर घेण्यात आली या शिबिरात स्त्रियांच्या गर्भाशयातील कॅन्सरची तपासणी जवळपास 90 महिलांची करण्यात आली शिवाय लाखो रुपये किमतीचे औषधे मोफत देण्यात आली व एक हजार रुग्णांना डोळे तपासून चष्म्याचे वाटप करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन किरण तात्या सावंत यांच्या हस्ते करण्यात आले
बोलताना किरण तात्या सावंत म्हणाले की सध्याच्या काळात आरोग्य सेवा फार महत्त्व आले आहे आरोग्य सेवा केल्यानंतर जे समाधान मिळते ते कुठल्याही सेवेत नाही इथून पुढील काळात सुद्धा आरोग्य सेवेच्या संदर्भात काही उपक्रम राबवले

गेल्यास मी त्यात स्वतः सहभागी होऊन हे कार्य पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणार आहे
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील तालुकाप्रमुख देवानंद बागल युवा सेनेचे समन्वयक निखिल चांदगुडे तालुकाप्रमुख राहुल कानगुडे शहर प्रमुख विशाल गायकवाड शहर प्रमुख संजय गुणवंत वरवाडी शाखाप्रमुख आजिनाथ इरकर द्वितीय कक्ष प्रमुख रोहित वायबसे नागेश शेंडगे वैद्यकीय कक्ष समन्वयक शिवकुमार चिवटे वस्ताद अजिनाथ कोळेकर पदाधिकारी उपस्थित होते
