शोभा फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय गौरव झांजुर्णे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला
जेआरडी माझा
यावेळी शोभा फाउंडेशन तर्फे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, रक्तदान शिबिर तसेच भूमिहीन कष्टकरी मजुरांच्या मुलांना शाळेत जाण्यासाठी मोफत सायकल वाटप, शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. नेत्र तपासणी मोहम्मद वाडी पुणे येथील एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालया मार्फत करण्यात आली. यावेळी 259 ज्येष्ठ नागरिकांचे डोळे तपासण्यात आले. रक्तदान शिबिरात 104 रक्तदात्यांनी रक्तदान केले. कष्टकरी मजुरांच्या शाळेत जाणाऱ्या 50

विद्यार्थ्यांना बारामती ॲग्रो चे व्हाईस चेअरमन मा. सुभाष आबा गुळवे यांच्या हस्ते सायकल वाटप करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सत्कार पर भाषणात बोलताना शोभा फाउंडेशनचे अध्यक्ष गौरव झांजुर्णे यांनी सांगितले की समाजात वावरत असताना आज आपल्याकडे सर्व सुख सुविधा आहेत पण जर कष्टकरी मोलमजूर कुटुंबांकडे बघितले तर त्यांच्या आई-वडिलांच्या त्यांच्या मुलांच्या सुखदुःखात त्यांच्या चेहऱ्यावर आनंद येण्यासाठी, हसू उमलण्यासाठी शोभा फाउंडेशन तर्फे नेहमीच फुल नाही पण फुलाची पाकळी म्हणून हातभार लागेल. तसेच रामवाडी येथील प्रत्येक कुटुंबातील मुलगी ही माझी बहीण मानून तिच्या लग्नासाठी शोभा फाउंडेशन तर्फे 25 हजार रुपयांची भांडी आंदण म्हणून देण्यात येणार

आहे अशी घोषणा देखील गौरव झांजुर्णे यांनी केली. यावेळी बोलताना सुभाष आबा यांनी शोभा फाउंडेशनने जी सामाजिक बांधिलकी जपत जे सामाजिक उपक्रम केले त्याबद्दल शोभा फाउंडेशनचे अध्यक्ष गौरव झांजुर्णे यांच्या कार्याचे कौतुक करून भविष्यात कसल्याही प्रकारची मदत लागल्यास ती करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे आयोजन शोभा फाउंडेशन आणि गौरव दादा मित्रपरिवार यांनी केले. सूत्रसंचालन रामवाडी गावचे माजी सरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष वारगड यांनी केले तर आभार प्रदर्शन विनोद झांजुर्णे यांनी व्यक्त केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *