करमाळा प्रतिनिधी

करमाळा विधानसभा मतदारसंघातील गावांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तांडा वस्ती सुधार योजनेतून तब्बल एक कोटी पंचावन्न हजार रुपये मंजुर झाले असल्याचे आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले. यासाठी आपणास मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे सहकार्य लाभले असल्याचे सांगितले. याबाबत अधिक सविस्तर माहिती देताना आमदार पाटील यांनी सांगितले की, तांडा वस्ती सुधार योजनेतून पारेवाडी-काँक्रेट रस्ता व गटार करणे-१० लाख, अर्जुननगर -भोगे वस्ती मध्ये काँक्रेट रस्ता

करणे-१० लाख, साडे-लाळगे वस्ती-इंदिरा नगर-पवार वस्ती काँक्रेट रस्ता ९ लाख, वडगाव-काळे वस्ती-जोशी वस्ती-अंधारे वस्ती-वडार वस्ती-मुसळे वस्ती-काँक्रेट रस्ता व गटार करणे-२८ लाख, भोसरे-अहिल्यादेवी होळकर नगर व बदने वस्ती मध्ये काँक्रेट रस्ता, खडीकरण व गटार करणे-२० लाख, शिंगेवाडी-मल्हार नगर मध्ये समाजमंदिर बांधकाम करणे-१० लाख, उपळवटे-वाघमोडे वस्ती काँक्रेट रस्ता करणे-५ लाख, कुर्डु-वडार वस्ती काँक्रेट रस्ता करणे-१० लाख, रोपळे-घोडके कांबळे वस्ती काँक्रेट रस्ता करणे-१० लाख, ढवळस-वडार वस्ती काँक्रेट रस्ता करणे-५ लाख, आंबाड-अहिल्यादेवी नगर काँक्रेट रस्ता करणे -४ लाख, कन्हेरगाव-रामोशी वस्ती काँक्रेट रस्ता करणे-१० लाख, नाडी-अहिल्यादेवी नगर काँक्रेट रस्ता करणे-१० लाख, बिटरगाव-रामोशी वस्ती काँक्रेट रस्ता करणे-४ लाख, शिडशिंगे-तळवाडी काँक्रेट रस्ता करणे-१० लाख. या कामांसाठी एकुण १ कोटी ५५ लाख रुपये मंजुर झाले असून लवकरच ही सगळी कामे सुरू होणार आहेत असेही आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले. तर तांडा वस्ती सुधार योजनेतून दुसऱ्या यादीस आमदार नारायण आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंजुरी मिळणार असुन उर्वरित गावांचा त्यात समावेश असल्याचे पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी सांगितले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *