करमाळा प्रतिनिधी

घारगाव परिसरात यंदा अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने पाण्याची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे पशुपक्षी व भटक्या जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन घारगावच्या माजी सरपंच लक्ष्मी संजय सरवदे यांच्या संकल्पनेतून पशुपक्षी व जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

शेत परिसरात मोठी पाण्याची टाकी उभारून त्यामध्ये नियमित पाणी उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमामुळे परिसरातील पक्षी, जनावरे व इतर मुक्या प्राण्यांची तहान भागण्यास मोठी मदत होणार आहे.

वाढते तापमान, कमी झालेला पाऊस आणि आटत चाललेले जलस्रोत यामुळे मुक्या प्राण्यांसमोर निर्माण झालेल्या संकटाची जाणीव ठेवून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. पर्यावरण संवर्धनासोबतच पशुपक्ष्यांप्रती असलेली संवेदनशीलता जपण्याचा हा स्तुत्य प्रयत्न असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

लक्ष्मी संजय सरवदे यांच्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून स्वागत होत असून, इतरांनीही आपल्या परिसरात पशुपक्ष्यांसाठी पाण्याची सोय करून सामाजिक जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *