
करमाळा प्रतिनिधी
सोलापूर, दि.२ (जिमाका) – वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या.), जिल्हा कार्यालय सोलापूर अंतर्गत विविध उपकंपन्यांमार्फत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाकरिता कर्ज योजनांसाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. पात्र लाभार्थींनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, पैलवान मारुती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ, श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ, ब्रम्हलिन आचार्य दिव्यानंद पुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळ, विणकर समाज आर्थिक विकास महामंडळ, श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ तसेच मुख्य कंपनी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ यांच्या माध्यमातून विविध कर्ज योजना राबविण्यात येत आहेत.

उपलब्ध योजना२५ टक्के बीज भांडवल योजनागट कर्ज व्याज परतावा योजना१ लाख रुपये थेट कर्ज योजनावैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनायोजनेची वैशिष्ट्येव्याज परतावा योजनेत संपूर्ण कर्ज बँकेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणार असून लाभार्थीने हप्ते नियमित भरल्यास कमाल १२ टक्क्यांपर्यंतचे व्याज महामंडळाकडून थेट बँक खात्यावर जमा होणार.१ लाख रुपये थेट कर्ज योजनेत लाभार्थ्यांनी दरमहा रु.२,०८५ प्रमाणे ४८ समान मासिक हप्त्यांद्वारे परतफेड केल्यास कोणतेही व्याज आकारले जाणार नाही.

थकीत हप्त्यांवर मात्र वार्षिक ४ टक्के दराने व्याज आकारले जाईल.अर्ज प्रक्रियाही योजना पूर्णपणे ऑनलाईन अर्ज स्वरूपाची असून लाभार्थींनी www.vnvjntdc.org या संकेतस्थळावर नोंदणी करून अर्ज सादर करावा.आवश्यक कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक आहे.

योजनांबाबत अधिक माहितीसाठी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या.), जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, दुसरा मजला, सात रस्ता, सोलापूर येथे संपर्क साधावा किंवा दूरध्वनी क्रमांक 0217-2992080 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक के. एम. गिऱ्हे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.