
करमाळा प्रतिनिधी
डॉ. पी.डी. पाटील बी.सी.ए. महाविद्यालय झरे, करमाळा महाविद्यालयास युजीसी (UGC) दिल्ली संस्थेचे २ एफ कलम २ अंतर्गत मान्यता मिळालेली आहे. तसेच AICTE नवी दिल्ली आणि DTE या महत्वाच्या शासकिय संस्थेकडून मान्यता मिळालेली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर अंतर्गत मान्यताप्राप्त बी.सी.ए. / एम.सी.ए. / बी.एड. / बी.कॉम. इत्यादी अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांपैकी डॉ. पी. डी. पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड. मॅनेजमेंट स्टडीज झरे (बी.सी.ए.) हे एकमेव विना अनुदानित महाविद्यालयास युजीसी (UGC) दिल्ली संस्थेचे २ एफ कलम २ अंतर्गत मान्यता प्राप्त झालेली आहे.

यामुळे आता या महाविद्यालयाला विविध शासकीय योजना, विविध शासकीय अनुदाने आणि मोठ्या शैक्षणिक प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. या मान्यतेमुळे महाविद्यालयाच्या शिक्षणाच्या दर्जात आणखी वाढ होणार असून ग्रामीण भागातील विद्याना चांगल्या शिक्षणाच्या संधी मिळणार आहेत, तसेच नवीन संशोधन करण्याच्या प्रस्तावास मान्यता मिळणार आहेत.

या महाविद्यालयात बी.सी.ए. हा अभ्यासक्रम शिकवण्यात येतो आणि मागील शैक्षणिक वर्षात महाविद्यालयाचा निकाल हा १०० % लागला आहे. या शैक्षणिक संकुलात शै. वर्ष २०२५-२६ आणि शै. वर्ष २०२६-२७ मध्ये विविध IT Software आणि इतर व्यावसायिक कंपन्यांशी महाविद्यालयाने करार केलेला असून त्यामुळे भविष्यात येथील मुलांना Job Placement मिळण्याचा फायदा होणार आहे.

युजीसीकडून कलम २ अंतर्गत मान्यता मिळालेली असल्यामुळे विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये बी.सी.ए. या अभ्यासक्रमास प्रवेश घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रा. जयप्रकाश बिले सर यांनी केले आहे. यामुळे करमाळा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण क्षेत्रात शिकण्यासाठी आनंदाचे व समाधानाचे वातावरण आहे.
