
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्याचे युवा नेते जेऊरगावचे कार्यसम्राट सरपंच पैलवान पृथ्वीराज भैय्या पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळा अयोध्या नगर सुपनवर वस्ती येथे विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात येणार आहे. वृक्षरोपण, आदर्श माता-पित्यांचा सन्मान, दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

करमाळा तालुक्यामध्ये गोरगरीब जनतेसाठी अहोरात्र झटणारे व्यक्तिमत्व म्हणजेच पृथ्वीराज भैय्या पाटील यांच्या रूपाने करमाळा तालुक्यामध्ये विकास भिमुख नेतृत्व लाभलेला आहे. पूर परिस्थिती असताना स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेक नागरिकांना त्यांनी पुरातून बाहेर काढले. पूरग्रस्तांना संसार उपयोगी साहित्य वाटप केले.

कर्मयोगी गोविंद बापू पाटील यांनी करमाळा तालुक्याच्या विकासासाठी त्याग केला. 23 वर्षे पायामध्ये चप्पल घातली नाही त्यांचाच वारसा आमदार नारायण आबा पाटील यांनी पुढे चालू ठेवला त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत पृथ्वीराज भैय्या पाटील यांनी समाजसेवेचे वृत्त हाती घेतले. करमाळा तालुक्यासाठी तीन पिढ्या पाटील कुटुंबाच्या अहोरात्र लोकांच्या मदतीसाठी तत्पर असतात. अशा या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

