करमाळा प्रतिनिधी

मराठा समाजाचे कुणबी दाखले देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यांतील काही तालुक्यात जाणीव पूर्वक वरिष्ठ अधिकारी अडचणी निर्माण करत आहेत त्यामुळे आपण मराठा आरक्षण उपसमिती अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन संबंधित अधिकारी वरती कारवाई करण्याची मागणी करणार आहे अशी माहिती मांढरे- पाटील यांनी दिली आहे. कुणबी दाखले देण्यासाठी काही अधिकारी हे जाणिवपूर्वक मराठा समाजातील तरुणांना नाहक त्रास देत आहेत. जाणीवपूर्वक उशीर लावत आहेत. घरात एका भावाला दाखला मिळालेला असला तरी दुसर्या भावाला देताना काही तरी त्रुटी काढून जाणीवपूर्वक त्रास देऊन उशीर करून मानसिक त्रास दिला जात आहे. प्रकरण दाखल केल्यानंतर दोन-दोन महिने सह्या केल्या जात नाहीत. हेलपाटे मारून तरुण वैतागल्या नंतर काही तरी त्रुटी काढून त्याला माणसिक त्रास होईल असे वर्तन अधिकारी करत आहेत. मुलांना उच्च शिक्षणसाठी प्रवेश प्रक्रिया चालू आसून आशातच कुणबी दाखला अवश्यक असताना मात्र अधिकारी अशा पध्दतीने वागत आहेत असा हा प्रकार सर्रासपणे चालू आसून संबंधित अधिकाऱ्यांची नावे आपल्याकडे असून मराठा आरक्षण उपसमिती अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांची आपण भेट घेऊन कारवाई करण्यासाठी आपण त्यांना भाग पाडू असे मत हनुमंत मांढरे-पाटील यांनी व्यक्त केले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *