
करमाळा प्रतिनिधी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना आव्हान केले आहे की, पेट्रोल, डिझेल, गॅस यांची बचत करा आणि सहकार्य करा त्यांच्या या आव्हानाला प्रतिसाद म्हणून भाजप किसान मोर्चाचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस अण्णासाहेब सुपनवर यांनी मोटर सायकल, फोर व्हीलर न वापरता बैलगाडी मध्ये प्रवास केला. देशातील सर्व नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या

आव्हानाला प्रतिसाद म्हणून सर्वांनी पेट्रोल डिझेल गॅस यांची बचत करून आपल्या देश सेवेमध्ये सामील व्हावे आपल्या जमिनीमध्ये रासायनिक खत टाकू नका सेंद्रिय शेती करून आपलं उत्पन्न वाढवा आपल्या जमिनीमधील अति रासायनिक व कीटकनाशकाच्या फवारणीमुळे जमिनीची सुपीकता कमी झाली आहे म्हणून ट्रॅक्टरचा शेतीमध्ये वापर कमी करून बैलाची

शेती करावी. दुधामध्ये सुद्धा भेसळयुक्त दूध बाजारामध्ये मिळत आहे. देशी गोमातेचे दूध आपल्या लहान मुला बाळांना द्यावे संकरित जर्सी गाई न पाळता आपली देशी गोमाता आपण पाळावी अनेक आजारांना बरे करणारी देशी गायी आहे. सेंद्रिय शेतीमुळे आरोग्य उत्तम प्रकारचे राहत आहे म्हणून विषमुक्त शेती सर्व शेतकऱ्यांनी करावी तरच मोदी यांनी केलेले आव्हान सार्थकी लागेल.

