
करमाळा प्रतिनिधी
मुस्लिम विकास परिषदेचे वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही मुस्लिम बालकांच्या खतना कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या शिबिरात 108 मुलांची खतना (मुंज) खतना स्पेशालिस्ट डॉ. उजेर बेग यांनी शस्त्रक्रिया करून केली आहे.

बुधवारी सकाळी सात वाजता नालबंद मंगल कार्यालयात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी मौलाना सय्यद अली मुजावर यांनी प्रार्थना करुन शिबीराची सुरवात करण्यात आली. यावेळी मुस्लिम विकास परिषदेचे अध्यक्ष फारुक जमादार, जहांगीर बेग, न्यु इरा इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष अजीम मोगल, कै.ना.म. जगताप शाळेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मजहर शेख, बकशभई शेख, जमीर शेख, मोहसीन नालबंद यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

यावेळी या शिबिरास माजी नगराध्यक्ष शौकत नालबंद, युवा नेते अमीरशेठ तांबोळी, जेष्ठ पत्रकार नासीरभाई कबीर, पत्रकार अशपाक सय्यद. रा.कॉं. चे आझाद शेख आदी जणांनी भेटी दिल्या.

यावेळी मौलाना मुजावर म्हणाले की, इस्लाम धर्मात खतनाला विशेष महत्त्व आहे. अशा शिबीरामुळे खर्चाची बचत होते कारण मुस्लिम समाजातील लहान लहान मुलांना खतना करण्यासाठी सोलापूरला जावे लागते. समाजातील गरीब लोकांना खर्च परवडत नाही परंतु गेल्या अनेक वर्षांपासून मुस्लिम विकास परिषद दरवर्षी शिबिर आयोजित करत आहे. त्यामुळे अनेक लहान बालकांना याचा लाभ मिळत आहे असे ते यावेळी म्हणाले.

सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी अरबाज बेग, असीम बेग, समीर शेख, शाहरुख शेख, शाहीद बेग, जावेद शेख,अकील सय्यद, आलीम खान, सोहेल शेख आदीं जणांनी परिश्रम घेतले. शेवटी फारुक जमादार यांनी आभार मानले.