
करमाळा प्रतिनिधी
राहुल आत्राम, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रभारी अधिकारी टेंभुर्णी पोलीस ठाणे यांना बातमीदार मार्फत बातमी मिळाली की मौजे वांगी नंबर 1 तालुका करमाळा येथील नवनाथ शिंदे यांच्या मालकीचे घरामध्ये पत्त्याचा क्लब चालू असल्याची बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी सदर ठिकाणी छापा टाकण्याकरिता दिनांक 17/5/2026 रोजी 16/20 वाजता गेले असता त्या ठिकाणी काही इसम वर्तुळाकार टेबल चा वापर करून खुर्चीवर बसून पत्त्याच्या डावावर पैसे लावून जुगार खेळत असल्याचे

दिसल्याने त्यांना जागीच पकडून ना विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) महादेव अण्णासाहेब साळुंखे वय 67 रा.भिवरवाडी तालुका करमाळा 2) गणेश बलभीम ठोंबरे वय 39 रा.केतुर नंबर 2 ,3) आकाश मच्छिंद्र अवघडे वय 30 रा. सिद्धार्थ नगर करमाळा 4) संतोष अण्णा गायकवाड वय 38 रा. केतूर नंबर 2 , 5) राजेंद्र दुर्गादास गायकवाड वय 42 रा.जेऊर 6) वैभव गोपाळ जाधव वय 30 रा. शेलगाव वांगी 7) स्वप्निल मच्छिंद्र खंडाळे वय 19 रा.वांगी नंबर 1 यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे

विचारपूस केली असता त्यांनी जागा मालक 8) नवनाथ शिंदे, क्लब चालक 9) सोमनाथ डावरे यांचे क्लब मध्ये जुगार खेळणे करिता रोख रक्कम 52560/-रुपये व त्यांच्या एकूण 6 मोटर सायकली विविध कंपनीच्या, काळी रंगाची पिवळे पट्टे असलेली अप्पे कंपनीची टमटम रिक्षा, पांढरे रंगाची नेक्सन कार, गोलाकार लाकडी टेबल, आठ प्लास्टिक खुर्च्या ,52 पत्त्याचे तीन डाव, बॉलपेन, आकडेमोड केलेला कागद इत्यादी सर्व मिळून एकूण किंमत 10,29,560/- रुपयाचा मुद्देमाल मिळून आला तो गुन्ह्याच्या कामी जप्त केला आहे.

जुगार कारवाई संदर्भात पोलीस कॉन्स्टेबल 2029 चेतन अशोक पवार करमाळा पोलीस ठाणे यांनी जागा मालक, क्लब चालक व जुगार खेळताना मिळून आलेल्या इसमांच्या विरुद्ध फिर्याद दिल्याने महाराष्ट्र जुगार कायदा कलम 4 व 5 प्रमाणे करमाळा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 426/2026 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे राहुल आत्राम प्रभारी अधिकारी टेंभुर्णी यांनी पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंदे त्वरित बंद करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा असे आवाहन केले आहे.

सदरची कारवाई ही अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, प्रीतम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, अंजना कृष्णा, मॅडम, सहाय्यक पोलीस अधीक्षक करमाळा उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली राहुल आत्राम, सहाय्यक पोलीस अधीक्षक, प्रभारी अधिकारी टेंभुर्णी, करमाळा पोलीस ठाणे कडील बनकर पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार अलीम शेख, अजित उबाळे, रविराज गटकुळ, सनी सातव, दुष्यंत ढेंबरे टेंभुर्णी पोलीस ठाणे कडील राजेश लांडगे, केशव झोळ, सुरज मुलानी , पोलीस कॉन्स्टेबल जगताप यांनी केली आहे.
सदर गुणाचा तपास पोलीस हवलदार दुष्यंत ढेंबरे, करमाळा पोलीस ठाणे हे करीत आहे.