करमाळा प्रतिनिधी

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा सुविधा उपलब्ध करण्याच्या उद्देशाने अभिनव कुस्ती संकुल व विद्यालय, वाशिंबे येथे पहिल्यांदाच दोन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्ती मॅट उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रत्येकी सुमारे साडेपाच लाख रुपये किमतीच्या या मॅटमुळे विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सुविधांमध्ये प्रशिक्षण घेण्याची

संधी मिळणार आहे. ग्रामीण भागासाठी हा एक अभिनव उपक्रम मानला जात असून, येथे विद्यार्थ्यांना पहिली ते बारावीपर्यंत सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षणासोबत व्यावसायिक कुस्ती प्रशिक्षण दिले जाणार आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निवासाची तसेच सकस आहाराचीही उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.

याठिकाणी १०० फूट बाय ५० फूट आकाराचा आधुनिक आंतरराष्ट्रीय दर्जाचा इंडोर कुस्ती हॉल उभारण्यात आला असून महाराष्ट्र व हरियाणातील अनुभवी तसेच NIS प्रशिक्षित प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नव्याने उपलब्ध झालेल्या कुस्ती मॅटच्या पूजन कार्यक्रमावेळी संस्थापक आबासाहेब झोळ, प्रा.महादेव झोळ, गणेश झोळ, सतीश झोळ,

शैलेश झोळ, पियुश डोंबाळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांना खेळाच्या माध्यमातून करिअर घडवता यावे यासाठी पूर्णवेळ कुस्ती प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले असून भविष्यात येथे राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धा आयोजित करण्याचा संस्थेचा मानस असल्याचे सांगण्यात आले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *