
करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहरातील नगरपालिका जागेवरील सुमंतनगर झोपडपट्टी, सिद्धार्थ नगर झोपडपट्टी, संभाजीनगर झोपडपट्टी, मोहल्ला गल्ली झोपडपट्टी, जामखेड रोड झोपडपट्टी, फंड गल्ली झोपडपट्टी, चांदगुड गल्ली झोपडपट्टी, यल्लमा मंदिर झोपडपट्टी, मौलाली नगर झोपडपट्टी, करमाळा शहरातील सर्व लहान लहान झोपडपट्टी कायम करून त्याची नोंद सिटीसर्वे मध्ये करण्यात यावी व आहे त्या जागेवर घरकुल देण्यात यावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी सोलापूर यांना दिनांक 29/ 4 /2026 रोजी

निवेदन दिले होते त्यानुसार जर नगरपालिकेने अतिक्रमण नियमानुकूल करण्याच्या कामास सुरुवात केली नाही तर संघटनेच्या वतीने दिनांक 13/ 5/ 2026 रोजी पासून करमाळा नगर परिषदेसमोर उपोषण करणार होतो परंतु त्यांनी आपणास 12/ 5/ 2026 रोजी मुख्याधिकारी नगरपरिषद करमाळा यांनी पत्र दिले व आंदोलन स्थगित करण्याचे आव्हान केले आहे त्यानुसार आपण उपोषणास तात्पुरती स्थगिती देत आहोत. त्यांनी दिलेल्या पत्रा नुसार महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966

च्या तरदुतीनुसार शासकीय जमिनीवरील १/१/२०११ पर्यंतच्या निवासी अतिक्रमण नियमित करण्याबाबत महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक जमीन-२०२६/प्र क्र २०/जमीन-१ मंत्रालय मुंबई दिनांक २५/३ 2026 च्या शासन निर्णयानुसार अतिक्रमण धारक यांचे अर्ज दिनांक 31 डिसेंबर 2026 पर्यंत मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे असे पत्र मुख्याधिकारी यांनी दिले. त्यावेळी उपस्थित नगरसेवक संदीप कांबळे, रिपब्लिकन सेना जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण ओहोळ, सामाजिक कार्यकर्ते नवनाथ खरात व पंचशील स्पोर्ट सोशल क्लबचे अध्यक्ष नामा भाऊ लोंढे उपस्थित होते.

