करमाळा प्रतिनिधी

रावगाव ता. करमाळा येथे ग्रामपंचायत रावगाव व बुधराणी हास्पिटल पुणे यांच्या वतीने मोतीबिंदू निदान व नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये एकूण 138 गरजवंतांनी या शिबीराचा लाभ घेतला. यामध्ये 23 गरजवंतांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पुणे येथील बुधराणी हास्पिटल येथे पाठविण्यात येणार आहे तसेच एकूण 49 गरजुंना नंबरचे चष्मे

देण्यात येणार आहेत. या शिबीरात मोतीबिंदू, काचबिंदु, ज़तूबाधा, जाळी येणे, लासूर, नेञपटलाचे आजार, डोळ्याच्या मागील पडद्याचे आजार, तिरळेपणा, इत्यादी आजारा विषयी डॉक्टर अक्षय ताकवले, डॉक्टर अजीत जाधव, डॉ. प्रशात जगताप यानी मार्गदर्शन कले.

रावगावचे प्रथम नागरिक तथा सरपंच संदिप शेळके, सर्व ग्रामपंचायत सदस्य व बुधराणी हास्पिटल पुणे यांनी या शिबीराचे आयोजन करुन लोकांना नविन दृष्टी दिली याबद्दल ग्रामस्थांच्यावतीने आभार मानण्यात आले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *