
करमाळा प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील डॉ. दुरंदे गुरुकुल या शैक्षणिक संस्थेने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवत राज्यस्तरीय विविध स्पर्धात्मक परीक्षांमध्ये दैदिप्यमान यश संपादन केले आहे. गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धिमत्ता, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर राज्यात मानाचे स्थान मिळवत संपूर्ण जिल्ह्याचा अभिमान वाढवला आहे.

श्रेया वैजनाथ दुरंदे (इयत्ता पहिली) हिने मंथन राज्यस्तरीय परीक्षेत सोलापूर जिल्ह्यात प्रथम आणि राज्यात सहावा क्रमांक मिळवून अत्यंत लहान वयात मोठे यश संपादन केले.
स्वराज गोवर्धन शिंदे यांनी गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यात तिसरा क्रमांक मिळवत सोलापूर जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान पटकावला.
लक्षवेध प्रज्ञाशोध परीक्षेत देखील गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.
सार्थक सागर हजारे – राज्यात चौथा, जिल्ह्यात दुसरा

आर्वी शिवाजी झाकणे – राज्यात पाचवी, जिल्ह्यात तिसरी
राजवीर श्रीकांत साखरे – राज्यात सहावा, जिल्ह्यात चौथा
शिवराज विशाल जगताप – राज्यात सहावा, जिल्ह्यात चौथा
स्वराली हनुमंत पाडुळे – राज्यात नववी

या यशामागे विद्यार्थ्यांची अथक मेहनत, डॉ. दुरंदे गुरुकुलच्या शिक्षकांचे उत्कृष्ट मार्गदर्शन आणि पालकांचे भक्कम पाठबळ आहे. ग्रामीण भागातून एवढ्या मोठ्या प्रमाणात राज्यस्तरावर यश मिळवणे ही अत्यंत गौरवास्पद बाब आहे.
डॉ. दुरंदे गुरुकुल आज केवळ शिक्षण देत नाही, तर गुणवत्तापूर्ण, स्पर्धात्मक आणि उज्ज्वल भविष्य घडवणारे विद्यार्थी तयार करत आहे, हे या निकालातून स्पष्ट झाले आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि परिवर्तन प्रतिष्ठान व डॉ. दुरंदे गुरुकुल संकुलाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.अमोल दुरंदे व उपाध्यक्ष डॉ. विद्या दुरंदे यांनी मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.