
करमाळा प्रतिनिधी
राजीव गांधी सार्वजनिक वाचनालय रावगाव ता. करमाळा जि.सोलापूर येथे क्रांतीसुर्य सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 199 व्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा रावगावचे सहशिक्षक अनिल काळूखे यांचे हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी माजी आदर्श मुख्याध्यापक दत्तात्रय कानडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बबन पाटूळे, सहशिक्षक माधव फुदे, प्रताप राऊत, बप्पा शिंदे,दादासाहेब बुधवंत, रामदास भूजबळ आदि उपस्थित होते.

